मुंबई - बनावट टीआरपी रेटिंगद्वारे कोट्यवधीच्या जाहिराती मिळवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या आणखी तीन अधिकाऱ्यांना शनिवारी समन्स बजाविले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी यांना रविवारी सकाळी गुन्हे शाखेकडे हजर रहावयाचे आहे. मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिव सुंदरम यांनी शनिवारी चौकशीसाठी हजर रहाण्याबाबत पत्राद्वारे असमर्थता दर्शविल्यानंतर अधिकाऱ्यांनी इतरांकडे पहिल्यादा विचारणा करण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी मॅडिसन वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सॅम बलसारा यांच्याकडून पोलिसानी माहिती घेतली. बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्याना मदत करणाऱ्या रॅकेटचा मुंबईपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत रिपब्लिकनसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे. त्यासंबंधी चॅनेलच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांनी 'सीएफओ' शिव सुंदरमला शुक्रवारी समन्स जारी केले होते. त्यांनी आज हजर न होता, पत्र लिहून मुदतवाढ मागितली आहे, चौकशीला सहकार्य करण्याला तयार आहोत, मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे, ती होईपर्यंत आमच्या कोणाकडे चौकशी करू नये, मी वैयक्तिक कारणास्तव मुंबई बाहेर असून केवळ १४ व १५ ऑक्टोबरला उपस्थित असणार असल्याचे कळविले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रिपब्लिक चॅनेलच्या अन्य तिघा अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे. पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न उलटविला'रिपब्लिक' च्या मुख्य वित्तीय अधिकारी शिव सुंदरम यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील रिटवर सुनावणी होईपर्यंत कोणालाही चौकशीला बोलवू नये, असे सांगत एकप्रकारे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला बळी न पडता इतरांना समन्स बजावित तातडीने चौकशी करण्याचा निर्णय घेतला,