शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

खारघरमधील ट्रस्टने केली १ कोटी ९८ लाखांची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 10:51 AM

Crime News : औरंगाबाद मधील श्री शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी याविषयी तक्रार केली आहे.

नवीन पनवेल : खारघरमधील आरटीआय पब्लीक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांने अनुदान देण्याचे अमिष दाखवून १५ जणांना १ कोटी ९८ लाख रूपयांना फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास आर्थीक गुन्हे शखेकडे वर्ग करण्यात आला आहे.                         औरंगाबाद मधील श्री शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी याविषयी तक्रार केली आहे. जाधव हे पदाधिकारी असलेल्या संस्थेच्यामाध्यमातून शैक्षणीक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या शाळेतील एक शिक्षकाने खारघरमधील आरटीआय पब्लीक चॅरीटेबल ट्रस्टकडे हजारो कोटी रूपये आहेत. ते सामाजीक उपक्रमासाठी संस्थेला पाच कोटीपर्यंत मदत उपलब्ध करून देतील असे सांगितले. जाधव यांनी मे २०१९ मध्ये खारघरमधील आरटीआय ट्रस्टच्या कार्यालयात येऊन माहिती घेतली. आरटीआय ट्रस्टचे संस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाधव यांना आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. ट्रस्टचे आयसीआयसीआय बँकेत ७८८९ कोटी रूपये शिल्लक असल्याचे सांगितले. राज्यातील अनेक संस्थांना मदत केल्याचेही सांगितले. ज्या संस्थांना मदत हवी आहे त्यांनी ५ लाख रूपये भरून ट्रस्टचे सदस्य व्हावे असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी त्यांच्या दोन्ही संस्थांच्या नावाने एकूण १० लाख रुपये दिले. आरटीआय ट्रस्टने त्यांच्या दोन्ही संस्थांसाठी ५ कोटी रूपयांचा चेक दिला. परंतु चेक बँकेत जमा करू नका असे सांगितले. चेकवरील तारखेची मुदत संपल्यानंतर पुन्हा ट्रस्टशी संपर्क साधला असता ट्रस्टचे फिनो बँकेशी टायप झाले असून तेथे ४०० कोटी रूपयांची एफडी करत आहोत. त्यानंतर पैसे देतो असे सांगितले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळाले नसल्यामुळे जाधव यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरटीआय चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी मिळून ४ जणांविरोधात ४ जूनला गुन्हा दाखल केला आहे.आरटीआय ट्रस्टने जाधव यांच्याप्रमाणे जवळपास १५ जणांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. या सर्वांची एकूण १ कोटी ९८ लाख रूपयांची फसवणूक झाली असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. हे प्रकरण तपासासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. 

पुढील नागरिकांची झाली फसवणूकजगन्नाथ जाधव - १० लाखमंगेश भागवत - ३५ लाखआदित्य पगारे - १० लाखगणेश ढोबळे - २५ लाखमनोज सोनवणे - ३ लाखराजु बोढरे - ३ लाखभगवान गायकवाड - ५ लाखवैशाली नेहरकर - २५ लाखदादासाहेब मुंडे - ३ लाखशशी देवरे - १७ लाखकिरण गायकवाड - ४० लाखकुंदन शिंदे - ५ लाखसुदर्शना अशोककुमार - ७ लाखनिलेश घुगे - ५ लाखगणेश जगताप - ५ लाख

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी