शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

डोंबिवलीत सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:33 AM

 सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला.

डोंबिवली :  सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला.

पूर्वेतील मानपाडा रोडवर गावदेवी मंदिर परिसरात रमेश गोल्ड नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. या दुकानाचे मालक रमेश नहार हे गुरुवारी रात्री दुकान बंद करून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत दुकानातला माल घेऊन निघालेल्या प्रदीप जैन नामक कामगारावर अचानक दोन जणांनी हल्ला केला. यावेळी प्रदीपवर गोळीबारही करण्यात आला, मात्र सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. यावेळी झालेल्या झटापटीत त्याच्या डोक्याला दुखापत झाली. हा सगळा प्रकार पाहून प्रदीप आणि रमेश नहार यांनी आरडाओरडा केला असता नागरिकांनी धाव घेत दोन्ही लुटारूंना पकडलं आणि बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

याप्रकरणी टिळकनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकारामागे लुटमारीचा हेतू असल्याची शक्यता सकृतदर्शनी व्यक्त होत असून लुटारू नेमके कोण आहेत आणि त्यांच्याकडे बंदूक कुठून आली? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा