शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

येरवड्यातील दोन खुनांच्या गुन्ह्यात तब्बल २९ आरोपींना अटक, दहा विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 10:03 PM

निर्घृण खुनाच्या दोन गंभीर घटनांमुळे येरवडा परिसरात झाली होती खळबळ निर्माण

ठळक मुद्देयेरवडा पोलिसांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना केली अटक  

पुणे : येरवडा परिसरात तीन दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या दोन युवकांच्या निर्घृण खून प्रकरणी येरवडा पोलिसानी तब्बल २९ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये १० विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.निर्घृण खुनाच्या दोन गंभीर घटनांमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली होती. येरवडा पोलिसांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना शिताफीने अटक केली.  पंचशीलनगर येथील प्रतिक वन्नाळे या युवकाचा किरकोळ वादातून २५ मे रोजी रात्री कॉमरजोन येथील मोकळ्या मैदानात डोक्यात कुराड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी बच्चू उर्फ नवीन वडावराव, आमीन शेख, राहुल भोसले, तय्यब शेख या चार आरोपींना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.  लक्ष्मीनगर येरवडा येथील पूर्व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नितीन कसबे हा तात्पुरता जामिनावर सुटला होता. येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर अवघ्या दोन तासात त्याचा सादलबाबा चौकात तीक्ष्ण हत्याराने वार करून येरवड्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीने खून केला होता. या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश कंचीले,आकाश सपकाळ, ओमकार सोनवणे, चेतन भालेराव, कुणाल जाधव, अभिषेक खोंड, अक्षय सोनवणे, आकाश मिरे,अर्जुन मस्के,राजवीर सावत्रा, निलेश पुंड, गणेश अडसूळ, लक्ष्मण गजरमल, रिपेन्स चिआप्पा, प्रज्वल कदम अशा पंधरा आरोपींसह सहा विधिसंघर्षग्रस्त बालकांना विरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक करून कारवाई करण्यात आली. येरवड्यात सराईत गुन्हेगारांच्या टोळीयुद्धातून हे गुन्हे घडत असल्याचे यामुळे निदर्शनास आले आहे. लॉकडाऊन  काळात येरवड्याच्या कंटेनमेंट झोन मध्ये झालेल्या निर्घृण खुनांच्या गंभीर गुन्ह्यांमुळे  एकच खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्तांनी या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. 

येरवडा पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात गुन्ह्यातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात यश आले. या गंभीर गुन्ह्याचा सत्तास वरिष्ठ पोलिस अधिका?्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार बाळासाहेब गायकवाड,  हनुमंत जाधव, किरण खुडे, पोलीस कर्मचारी रामदास घावटे, सचिन रणदिवे, गणेश पाटोळे, विनायक साळवे, संजय सकट, राहुल परदेशी, अमजद शेख,  शरद बांगर,  दौंड, सुनील सकट, नागेश कुवर, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, सुनील सकट, शरद दौंड, नितीन बोराडे यांच्या पथकाने शिताफीने केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMurderखून