शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

Video: आधीही दोनवेळा केलेले, सैन्यातील पतीसह सासू सासऱ्याकडून जादूटोणा; घरासमोर ठेवले कुंकू, टाचण्या, लिंबू, राख, तीळ

By दत्ता यादव | Published: April 09, 2023 4:01 PM

पती सैन्य दलात कार्यरत असून, तो सध्या सुटीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राहत्या घरासमोर रात्रीच्या वेळी पतीने हळदी-कुंकू, टाचण्या, राख टाकून जादूटोणा केल्याची तक्रार विवाहिता उज्ज्वला पद्ममाकर जाधव (वय ३५, रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी सैन्यातील पतीसह, सासू, सासऱ्यांवर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पती पद्ममाकर बळवंत जाधव, सासू कुसुम बळवंत जाधव, सासरे बळवंत विठोबा जाधव (सर्व रा. शेळकेवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवाहिता उज्ज्वला जाधव या कारंडवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा पती सैन्य दलात कार्यरत असून, तो सध्या सुटीवर आला आहे. १ एप्रिल रोजी रात्री एक वाजता पती कारंडवाडीतील घरासमोर आला. हळदी-कुंकू भरून व टाचण्या टोचून ठेवलेले नारळ, लिंबू, टाचण्या, राख, सिंदूर, काळे तीळ व पपई हे साहित्य ठेवले. अशाच प्रकारे यापूर्वीही दोन वेळा हे साहित्य घरासमोर आणून ठेवले होते.

अशा प्रकारे उज्ज्वला जाधव यांच्यावर जादूटोणा केल्याने त्यांना व त्यांच्या दोन्ही मुलांना मानसिक त्रास झाला. हा प्रकार वारंवार होऊ लागल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पती, सासू सासऱ्यावरही जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे अधिक तपास करीत आहेत.

सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग..उज्ज्वला जाधव यांच्या घरासमोर तसेच एका दुकानासमोर सीसीटीव्ही आहेत. या सीसीटीव्हीमध्ये हा सारा जादूटोण्याचा प्रकार कैद झाला आहे. हे सारे पुरावे त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी