नवी मुंबई - निलंबित डीआयजी निशिकांत मोरे प्रकरणातील बेपत्ता मुलीसोबत सापडलेल्या २० वर्षीय मुलीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा मुलगा बेपत्ता मुलीच्या कुटुंबियांच्या गॅरेजमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपासून काम करत होता. त्यामुळे त्याची आणि मुलीची ओळख होती असल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.
डीआयजी मोरे प्रकरण : बेपत्ता मुलगी सापडली 20 वर्षीय मुलासोबत
या प्रकरणामुळे निशिकांत मोरे यांच्याविरोधात अपहरणाचा केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी मोरे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे देखील स्पष्ट केले. निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलेली अल्पवयीन बेपत्ता तरुणी अखेर काल सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देहराडूनमधून या पीडित तरुणीला पोलिसांनी मुंबईत आणलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. एका २० वर्षीय मुलासोबत तरुणीला मुंबईत आणल्याचं सांगण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती.