नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 2 कोटींच्यावर गेला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. देश कोरोनाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना माणुसकीला काळीमा घटना समोर आली आहे. लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा भयंकर प्रकार ट्विटरवरून समोर आला आहे.
एका तरुणीने हा लज्जास्पद प्रकार सर्वांसमोर आणला आहे. सोशल मीडियावर या प्रकाराविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेत होती. त्याचवेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडरच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. अत्यंत घाणेरड्या भाषेत त्या व्यक्तीने पीडित मुलीकडे सेक्सची मागणी केली. भावरीन कंधारी या तरुणीने सोशल मीडियातून या घटनेला वाचा फोडली आहे. अनेकांनी आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.
कोरोना नियमावलीचं पालन न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आजारी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांकडून पोलिसांनी दंड आकारल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीवर निर्बंधादरम्यान बाहेर पडल्यामुळे कारवाई केली आहे. पत्नीसोबत आपल्या 4 महिन्यांच्या मुलाला घेऊन रुग्णालयात घेऊन गेलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून दंड वसूल केला आहे. फिरोजाबाद येथील रहिवासी राजू कुशवाह हे मंगळवारी रात्री बाईकने आपल्या 4 महिन्यांच्या आजारी बाळाला घेऊन डॉक्टरकडे गेले होते. त्यांच्यासोबत यावेळी त्यांची पत्नी राधा देखील होती.