मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जया महल लॉज मधील खोली भाड्याने घेऊन त्या मधून क्रिकेटवर सट्टा चालवणाऱ्या दोघा आरोपींना नवघर पोलिसांनी १ लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील , सहाय्यक निरीक्षक योगेश काळे व व रोशन देवरे आणि पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास जया महल लॉजच्या एका खोलीत छापा मारला. त्यावेळी तेथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवला जात असल्याचे उघडकीस आले . शैलेंद्रसिंग भारतसिंग मालावत (४२) रा . स्प्रिंगरोज , जहांगीड एन्क्लेव्ह , मीरारोड व सुमित प्रकाश जैन (३८) रा. श्री गंधर्वराज , बाळाराम पाटील मार्ग , भाईंदर या दोघा सट्टेबाजांना अटक केली . त्यांच्या कडून मोबाईल , लॅपटॉप , एलईडी व रोख मिळून १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदर लॉजची खोली घेण्यासाठी आरोपींनी शेख मोहमद याच्या नावाच्या व्यक्तीच्या आधारकार्ड चा वापर केला होता . मॅचच्या ओव्हर नुसार देखील सट्टा घेत असत .