शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

पाकिस्तानच्या क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठाण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 8:38 PM

Cricket Betting Case : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, पेशावर झल्मी आणि कराची किंग यांच्यातील सामना

ठाणे : पाकिस्तानातील पेशावर झल्मी आणि कराची किंग या दोन संघांमधील ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीरपणो सट्टा खेळणाऱ्या धीरेन ठक्कर आणि भव्या वीरा या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने शनिवारी अटक केली. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत मिळाली आहे.ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील नटवर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये क्रिकेटवर सट्टा खेळला जात असल्याची टीप ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र घोलप यांना मिळाली होती. त्याच आधारे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश जाधव आणि हवालदार नितीन ओवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास या हॉटेलमधील एका खोलीतून धिरेन ठक्कर आणि भव्या वीरा यांच्यासह तिथेच टीव्ही पाहणार दोन महिलाही तिथे आढळल्या. त्यावेळी टीव्हीवर पाकिस्तान सुपर लीग २०२२ चे २०-२० हे क्रिकेटचे सामने सुरू होते.

कराची किंग्जविरुद्ध पेशावर झल्मी या दोन संघामध्ये हे सामने सुरू होते. त्यावेळी आपण क्रिकेटवर बेटिंग खेळत असल्याची कबुलीही पोलिसांना दिली. हा व्यवसाय मोबाइल फोनवर रोखीने केला जातो. त्यासाठी लागणारे लोटस आणि डायमंड मोबाइल ॲप्लिकेशन हे पूर्वी प्रवीण बेग याच्याकडून ते घेत होते. सध्या हे ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड केतन भाई याच्याकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट बेटिंगच्या व्यवसायमध्ये आम्ही हिशोबाप्रमाणे रोख रक्कम देत असतो. या महिला मैत्रिणी असून, त्या केवळ भेटण्यासाठी आल्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचाही त्यांनी दावा केला. त्यांच्याकडून २० हजारांचे तीन मोबाइल जप्त केले आहेत. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ५ मे रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीthaneठाणेPakistanपाकिस्तानPoliceपोलिसArrestअटक