शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

उल्हासनगर महापालिकेचे बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र देणारे रॅकेट, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 8:35 PM

Crime News : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्दे उल्हासनगर महापालिका विद्युत विभागातील वायरमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र एक तरुणाला दिल्याचा प्रकार एका महिन्यापूर्वी उघड झाला होता.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका उपायुक्त व अन्य एका अधिकाऱ्यांच्या बनावट सहीचे नियुक्तीपत्र देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. अश्या किती तरुणांना नोकरीच्या नावाखाली फसविले हे उघड होणार असुन तरुणांनी अश्या रॅकेट पासून सावध राहण्याचे आवाहन उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी केले.

 उल्हासनगर महापालिका विद्युत विभागातील वायरमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र एक तरुणाला दिल्याचा प्रकार एका महिन्यापूर्वी उघड झाला होता. नियुक्तीपत्र महापालिका मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे व सहायक आयुक्त सासे यांच्या बनावट सहीचे होते. तसेच एका महिला कर्मचाऱ्याला वैधकीय कारण दाखवून बनावट वैधकीय सेवा निवृत्तीचे पत्र दिल्याचा प्रकार उघड झाला. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी अश्या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मध्यवर्ती पोलिसांनी नियुक्तीपत्र देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करून कैलास शेकडे याच्यासह दोघाला अटक करून सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी दिली. तसेच त्यांच्याकडून मोठे घबाळ मिळण्याची शक्यता असून नोकरीच्या नावाने किती तरुणाला फसविले. हेही तपासात उघड होण्याचे संकेत पोलिसांनी दिले.

 महापालिकेत सन २००३ साली नोकरी भरती झाल्यानंतर, मोठी नोकर भरती झाली नाही. मात्र महापालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या बनावट सहीने नियुतीपत्र देण्याचे प्रकार घडत आहेत. अश्या रॅकेटचा पर्दापाश झाल्याने, त्यांच्याकडून मोठी माहिती मिळून किती तरुणांना आतापर्यंत फसविले. हेही उघड होणार आहे. अनुकंपातत्वावर नोकरी, वारसहक्काने नोकरी, थेट नोकरी आदी प्रकार झाले का? याचाही तपास पोलीस करणार आहेत. यापूर्वी महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बनावट कागदपत्रांचा प्रश्न नेहमी ऐरणीवर आला. त्यानंतर तो का? गुंडाळण्यात आला? कारवाई का झाली नाही. आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. यानिमित्ताने त्यांची चौकशी झाल्यास अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार लटकण्यात येणार असल्याचे बोलले जाते. 

मोठे मासे अडकण्याची भीती? महापालिका उपयुक्तांच्या सहीचे बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याचा प्रकार उघड होऊन, याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र यामागे महापालिकेतील मोठे मासे कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच बनावट कागदपत्र देऊन महापालिकेत नोकरीला लागलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे यानिमित्ताने होत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीjobनोकरीMuncipal Corporationनगर पालिका