पुणे : शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात उमरगा तालुक्यातील औराद गावात एकाचा खून करुन पुण्यात पळून आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिटचारच्या पथकाने अटक केली. श्री मंगेश चौधरी (वय २०) आणि सागर प्रकाश ढोकणे (वय १९, दोघे रा. कर्वेनगर) अशी त्यांची नावे आहेत.
शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन झालेली भांडणे व त्यात वडिलांचा केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांचा पुतण्या अक्षय शेषराव दुधभाते (रा.पुणे ) याने त्याच्या घरातील दोघांना व पुण्यातील श्री चौधरी व सागर ढोकणे यांना घेऊन २१ मे रोजी दिगंबर दुधभाते (वय ४०, रा. औराद ता़ उमरगा,जि़ उस्मानाबाद) यांना वेळूच्या काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचा खून केला व त्यानंतर ते सर्व जण पुण्यात पळून आले होते.उमरगा पोलिसांनी याबाबतची माहिती पुणे पोलिसांना दिली होती.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस हवालदार सुनिल पवार यांना हे दोघे पाषाण सूस रोडवरील साई चौकात ५ जूनला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी सुनिल पवार,भालचंद्र बोरकर हे पथकासह बाणेर परिसरात सापळा रचला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते दोघे आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी त्यांना उमरगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार
Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस