भिवंडी ( दि. ३ ) कोणतेही कागदपत्र नसतांनाही बांगलादेशातून चोरट्या मार्गाने भारतात घेऊन राहणाऱ्या दोन बांगलादेशींसह या बांगलादेशींचे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एका इसमासह तिघांना शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे.
जैनल जाफुर खान वय २७ व यासीन अराफत अन्सारी वय २५ असे अटक करण्यात आलेल्या दोघा बांगलादेशीची नावे आहेत. तर इलियास उर्फ पप्पू मोहम्मद मुस्तफा अन्सारी रा नागाव असे या बांगलादेशींना मदत करून त्यांना भिवंडीत राहण्यासाठीचे बनावट आधार कार्ड व विविध बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. जैनल व यासीन हे दोघेही बांगलादेशचे रहिवासी असून त्यांनी भारत सरकारची कोणतीही परवानगी न घेता तसेच भारतात येण्यासाठी आवश्यक असलेले पारपत्र व विजा नसतानाही केवळ पैसे कमविण्यासाठी छुप्या मार्गाने भिवंडीत येऊन वास्तव्य करीत असल्याने शांतीनगर पोलिसांनी जैनल व त्याचा साथीदार यासीन या दोघांना गुरुवारी रात्री अटक केली असून त्यांना भारत सरकारचे बनावट आधार कार्ड आयकर विभागाची खोटी ओळख पत्र व भारत सरकारचे निवडणूक आयोगाचे खोटे ओळखपत्र बनवून देणाऱ्या इलियास यास शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.