जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले 2 मृतदेह, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:29 PM2022-02-13T20:29:18+5:302022-02-13T20:30:56+5:30

Crime News : या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरल्याने शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Two bodies were found hanging on a tree in the forest | जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले 2 मृतदेह, कारण ऐकून बसेल धक्का

जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले 2 मृतदेह, कारण ऐकून बसेल धक्का

Next

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहर तहसील भागातील मीना बडोदा आणि रनोलीदरम्यान घनदाट जंगलात एका प्रेमी युगुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधीच या प्रेमीयुगुलाने आपलं जीवन संपवल्याची चर्चा सुरु आहे. 

या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरल्याने शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे तरुण आणि तरुणी दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच पोहोचलेल्या वजिरपूर पोलीस ठाण्याने घटनास्थळाची पाहणी करून झाडाला लटकलेले दोन्ही मृतदेह खाली उतरवून आपल्या ताब्यात घेतले. वजीरपूर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत शबनम आणि रणजीत दोघेही मीना बडोदा येथील रहिवासी होते.

मला तुझ्यासोबत राहायचं नाही! पतीने मोबाईल देण्यास दिला नकार, पत्नी प्यायली पेपरमिंटचे तेल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

यासोबतच मुलीच्या वडिलांनी 10 फेब्रुवारी रोजी वजीरपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करून रणजितवरच संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन गंगापूर शहरातील सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. तसेच मेडिकल बोर्डाच्या उपस्थितीत दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाऊ शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पूर्णपणे प्रेमप्रकरणाशी संबंधित असून वजीरपूर पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या

Web Title: Two bodies were found hanging on a tree in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.