शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दोन लाचखोर नायब तहसीलदार अडकले एसीबीच्या जाळ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 9:22 PM

तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजश्री राजाराम मलेवार (४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे. 

ठळक मुद्दे तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने पडताळणी करून गुरूवारी तहसील कार्यालयात सापळा लावला.बिसेन याला मलेवार यांच्यासाठी १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

गोंदिया - मलम्याची वाहतूक करणारा टिप्पर सोडला म्हणून याचा मोबदला म्हणून १५ हजारांची लाच घेणाऱ्या दोन नायब तहसीलदारांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. येथील तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजश्री राजाराम मलेवार (४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांचा मलमा वाहतूक करणारा टिप्पर नायब तहसीदार मलेवार यांनी पकडून दंडात्मक कारवाई न करता सोडून दिला होता. त्याचा मोबदला म्हणून मलेवार यांनी २७ हजार ५०० रूपयांची मागणी केली. याबाबत नायब तहसीलदार बिसेन याने तक्रारदारांसोबत बोलणी करून मलेवार यांच्यासाठी रक्कमेची मागणी केली. तसेच तडजोडीअंती १५ हजार रूपयांवर बोलणी झाली. मात्र, तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने पडताळणी करून गुरूवारी तहसील कार्यालयात सापळा लावला. यात बिसेन याला मलेवार यांच्यासाठी १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक