शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

महिलेसह दोन मुलांना भररस्त्यात लाठ्या-काठ्याने मारहाण; मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतीय व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 3:16 PM

video get viral of openly beating of woman and two youths : व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देएक व्हिडिओ 34 सेकंदांचा आहे आणि दुसरा एक मिनिट 41 सेकंदांचा आहे. 34 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एका माणसाने लोकांच्या गर्दीतच एका महिलेला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याचे दिसून येते.

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एक महिला आणि दोन तरुणांना लाठ्या -काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ कैराना परिसरातील एका गावाचा आहे, जो सुमारे १५ दिवस जुना आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.बुधवारी याच प्रकरणाशी संबंधित दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एक व्हिडिओ 34 सेकंदांचा आहे आणि दुसरा एक मिनिट 41 सेकंदांचा आहे. 34 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एका माणसाने लोकांच्या गर्दीतच एका महिलेला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याचे दिसून येते. ती महिला रडत आहे आणि आपला जीव वाचवण्याची विनवणी करत आहे, परंतु कोणीही मदतीसाठी येत नाही. त्याचवेळी, दुसरा व्हिडिओ देखील त्याच प्रकरणाशी निगडित आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणांना काठ्यांनी मारहाण केली जात आहे. खाटांवर उलटे झोपवून तरुणांना लाठ्या -काठ्यांनी मारहाण केली जात आहे. आजूबाजूला उभी असलेली गर्दी दोन्ही तरुणांना अमानुष मारहाण पाहत आहे. मारहाणीदरम्यान कोणीतरी मोबाईलवरून व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगण्यात आले आहे.कोतवाली प्रभारी सांगतात की, व्हायरल झालेला व्हिडीओचा तपास केला जात आहे. त्याची चौकशी केली असता ती घटना परिसरातील एका गावातील असल्याचे निष्पन्न झाले. माहिती घेताना कळले की, या गावात पीडित महिलेचे सासर आहे. ती मुझफ्फरनगर जिल्ह्यातील गावातील रहिवासी आहे. तिच्या गावातील तरुण आपल्या मित्रासह महिलेला भेटण्यासाठी आले होते. सासरच्यांनी दोन्ही तरुणांना पकडून ठेवले होते. त्याचवेळी सासरच्यांनी दिलेल्या माहितीवरून महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी येऊन तरुण आणि महिलेला मारहाण केली. व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. एसपी सुकिर्ती माधव सांगतात की, ही बाब अद्याप निदर्शनास आलेली नाही. जर असे प्रकरण असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश