शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

नांदेडात कोट्यवधींच्या डांबर घोटाळ्यात दोन कंत्राटदारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 6:05 PM

शासनाला पंधरा ते वीस कोटींचा चुना लावल्याप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देनांदेडात २००८ ते २०११ या काळात गुरु-त्ता-गद्दी सोहळ्यानिमित्त कोट्यवधी रुपयांचे कामे करण्यात आली़निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा आणि मोरे कन्स्ट्रक्शनचे मनोज रावसाहेब मोरे यांना पोलिसांनी अटक केली़  

नांदेड : रस्ताकामासाठी डांबर खरेदीची बोगस बिले सादर करुन शासनाला पंधरा ते वीस कोटींचा चुना लावल्याप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पाठोपाठ उशिरा निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा आणि मोरे कन्स्ट्रक्शनचे मनोज रावसाहेब मोरे यांना पोलिसांनी अटक केली़  

नांदेडात २००८ ते २०११ या काळात गुरु-त्ता-गद्दी सोहळ्यानिमित्त कोट्यवधी रुपयांचे कामे करण्यात आली़ त्यामध्ये मजूर सोसायट्यांना मंजुरी नसताना कामे देणे, कामांचे तुकडे पाडणे, अवैधरित्या कामे मंजूर करुन घेणे या प्रकारात तत्कालीन अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव  अविनाश धोंडगे यांच्यासह १४ जणांवर आरोप आहेत़ सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांची दुसऱ्यांदा याचिका फेटाळली़ त्यानंतर आता डांबर घोटाळा समोर आला आहे. 

२०१०-२०११ या काळात शासनाने निर्देशित केलेल्या कंपन्यांकडून डांबर खरेदी न करता अन्य खाजगी कंपनीकडून डांबर खरेदी करणे, ते डांबर शासनाने निर्देशित केलेल्या कंपनीकडून खरेदी केल्याच्या बोगस पावत्या जोडणे, कागदोपत्री डांबर खरेदी करुन शासनाची फसवणूक करणे, शासनाच्या निधीचा अपव्यय करुन बोगस कामे करणे आदी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ हे प्रकरण विधानसभेपर्यंत गेल्यानंतर सहाय्यक अभियंता संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा कंत्राटदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ यात निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा, मोरे कन्स्ट्रक्शनचे मनोज रावसाहेब मोरे, एस़जी़पद्मावार, सोनाई कन्स्ट्रक्शनचे  सतीश देशमुख, सी़एस़संत्रे कन्स्ट्रक्शन, नुसरत कन्स्ट्रक्शनचे मोईज यांचा समावेश आहे़ यातील भास्कर कोंडा व मनोज मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़ 

राजकीय मंडळींची रीघ भास्कर कोंडा आणि मनोज मोरे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी रात्री सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती़ या दोघांना भेटायला येणाऱ्या राजकीय मंडळींमुळे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली़ 

सहा सप्टेंबरपर्यंत कोठडी अटक केलेल्या भास्कर कोंडा आणि मनोज मोरे यांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ 

आणखी काही जण रडारवर या प्रकरणात सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून आणखी काही कंत्राटदारही रडारवर असल्याची माहिती हाती आली आहे़ विशेष म्हणजे बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र मोकळे सोडण्यात आले आहे़ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढा मोठा घोटाळा कसा शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीArrestअटक