नालासोपारा - 122 करोडचा घोटाळा केला म्हणून 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात 2 मार्च 2019 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण 76 दिवस गुन्हा दाखल झाल्यावरही तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे कोणती कारवाई करत आहेत की आर्थिक व्यवहार करून घोटाळेबाज कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत का आरोप कामगारांनी केला आहे. पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारच्या सभेत मनपाच्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करणार असल्याचा सज्जड दम दिल्यानंतर मनपाने आणि विरार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून 25 पैकी आकाश इंटरप्रायजेसचे विलास चव्हाण या कंत्राटदाराला 22 एप्रिलला अटक केले व नंतर दोन दिवसात बालाजी सर्विसचे मंगरूळे बी. दिगंबरराव यांना अटक केले पण याची कुठेही वाच्यता किंवा याबाबत कोणालाही न सांगितल्याने तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांची तपासाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. उर्वरित 23 कंत्राटदारांना पोलीस कधी अटक करणार, पीडित कामगारांना खरोखरच न्याय देणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या संपुर्ण प्रकरणावर वसई न्यायालय गंभीर असून कोणत्याही कंत्राटदाराला व अटक असलेल्या दोघांना जामीन देत नसून विरार पोलिसांना मात्र काहीही सोयरसुतक नसल्याचे वाटते.मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने 122 करोड रुपयांचा घोटाळा विरार पोलिसांनी दाखल केला पण कारवाई होत नसल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू होती. राजकीय वरदहस्त असलेले मातब्बर त्या 23 कंत्राटदारांना नक्की पोलीस अटक करणार का हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. सदर गुन्ह्याचा उलगडा करून खरोखरच कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा गुन्हा विरार पोलिसांकडून काढून पालघर स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून विरार पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत वसई विरार मनपा सोबत पत्रव्यवहार सुरू असून पुरावे गोळा करत असल्याचे कारण देत टाळाटाळ सुरू ठेवली आहे. सेवा कर, व्यवसाय कर, कामगार राज्य विमा योजना, कामगार आयुक्तालय यांच्याशी गुन्ह्या संदर्भात पत्रव्यवहार करणे गरजेचे होते ते केले आहे की नाही ? असे अनेक सवाल करून विरार पोलीस नेमके ह्या प्रकरणात काय करत आहे हा प्रश्न कामगारांना पडला आहे.नेमके काय होते प्रकरणवसई विरार मनपाच्या 3165 ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण 122 करोड च्या घोटाळ्यात 29 करोड 50 लाख रुपयेचा शासकीय महसूलचाही समावेश असून 92 करोड 50 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाऱ्यांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.फरार असलेले 23 घोटाळेबाज ठेकेदारदिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सर्विस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई इंटरप्राइजेस (विनोद पाटिल), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्ट्रिकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरुखकर), बी एल होणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आणि श्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)