शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात मद्यधुंद मोटरसायकलस्वारांची दुचाकीला धडक, दोन तरुण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:39 AM

मद्यधुंंद अवस्थेत बेदरकारपणे दुचाकी चालवून तिघांनी एका दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील एकाच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला.

ठळक मुद्देआरडाओरड करीत आरोपी पळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यधुंंद अवस्थेत बेदरकारपणे दुचाकी चालवून तिघांनी एका दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील एकाच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉईंटजवळ सोमवारी रात्री हा भीषण अपघात घडला.महेश चिखले आणि राजेंद्र भोयर अशी जखमींची नावे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चिखले आणि भोयर स्कूटरवर जात असताना अत्यंत वेगात आलेल्या यामाहा मोटरसायकलवरील तिघांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. चिखले आणि भोयर दुभाजकाकडे समोर फेकल्या गेल्यावर आरोपीने एकाच्या पायाच्या पंजावरून मोटरसायकल नेली. त्यामुळे त्याचा पंजा पुरता चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर दारूच्या नशेत असलेले आरोपी बेदरकारपणे तेथून पळून गेले. सोमवारी रात्री १०.४० ते १०.५० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. पळून जातानाही आरोपी आरडाओरड करीत होते. दोन तरुण दुभाजकाजवळ गंभीर जखमी पडून दिसल्याने अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. अरुण वाघमारे आणि अन्य सेवाभावी तरुणांनी जखमींना उचलून बाजूच्या खासगी इस्पितळात दाखल केले. सक्करदरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा छडा लागला नव्हता. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.खर्ऱ्यासाठी गमावला जीवखर्रा खायची तलफ एका तरुणाच्या जीवावर बेतली. कुणाल मदनराव बेतवार (वय ३४) असे मृताचे नाव आहे. तो वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या आंबेडकर वॉर्डात राहत होता.समुद्रपूरच्या सचिन रमेश लाखे (वय ३४) यांच्यासोबत कुणाल नागपुरात आला होता. सोमवारी सकाळी ७.२० वाजता ते महिंद्रा पिकअप बोलेरोने (एमएच ३२/ क्यू ४०६९) ते आले होते. वर्धा मार्गावरील विवेकानंद चौकात सिग्नल बंद असल्याने लाखेने बोलेरो थांबवली. कुणालला खºर्याची तलफ आली. त्यामुळे तो वाहनातून खाली उतरला. नेमक्या त्याचवेळी सिग्नल सुरू झाल्याने एका ट्रकचालकाने जोरात वाहन दामटले आणि कुणालला धडक मारून त्याचा बळी घेतला. या अपघातामुळे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. माहिती कळताच धंतोली पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी लाखेंच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर