शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवालाच्या शरीराची केली चाळण, शवविच्छेदनात मृतदेहावर दोन डझन गोळ्यांच्या जखमा आढळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 9:50 PM

Sidhu Moose Wala Murder: मुसेवाला यांच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्यांच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर राज्य पोलीस कडक कारवाईच्या वळणावर दिसत आहेत. पंजाबपोलिसांनी उत्तराखंडमधून ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही पूर्ण झाले आहे. पाच डॉक्टरांच्या समितीने सिद्धू मुसेवाला यांचे पोस्टमॉर्टम पूर्ण केले आहे.मुसेवाला यांच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्यांच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या हत्याकांडात मुसेवालाच्या अंतर्गत अवयवांनाही जखमा आढळल्या आहेत. याशिवाय डोक्याच्या हाडातून एक गोळीही सापडली आहे.

एकानं समोरून झाडल्या गोळ्या, ६ जणांनी केलं कव्हर; १०० राऊंड फायर, अशी झाली मूसेवालाची हत्यामिळालेल्या माहितीनुसार, व्हिसेराचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, पोस्टमॉर्टमचे निकाल अद्याप पोलिसांना शेअर केलेले नाहीत. दुसरीकडे, सर्व संशयितांची ओळख पटल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आणि लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेतसिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस सोमवारी मानसातील कांचिया भागातील मनसुख वैष्णो ढाब्यावर पोहोचले. ढाब्यावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा स्कॅन करण्यात आला, २९ मे रोजी सीसीटीव्हीमध्ये काही मुले ढाब्यावर जेवण करताना दिसली, पंजाब पोलिसांनी सीसीटीव्ही सोबत घेतले आहेत. हल्लेखोर जेवण घेण्यासाठी या ढाब्यावर थांबले असल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्हीत दिसणारी ही मुले खरोखरच हल्लेखोर असली तरी त्यांचा या हत्येत सहभाग आहे की नाही, याचा तपास आता होणार आहे.लॉरेन्स बिश्नोई चौकशी मात्र, पंजाबमधील मानसा येथे रविवारी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असून त्याच्या बॅरेक्सचीही झडती घेतली आहे. मात्र, झडतीदरम्यान पोलिसांना लॉरेन्सच्या बॅरेकमधून काहीही मिळाले नाही.

  

 

टॅग्स :FiringगोळीबारPunjabपंजाबPoliceपोलिसDeathमृत्यूcctvसीसीटीव्ही