मुंबई - २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत शेतकऱ्यांचा लोक संघर्ष मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला होता. या मोर्च्यात दुष्काळ निवारण आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकला. मात्र, या मोर्च्यादरम्यान दोन शेतकरी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या मोर्च्यात संपत सिंगा नाईक (वय ४२) आणि फतेह सिंग चौधरी (वय ४०) हे हजारो शेतकऱ्यांप्रमाणे सामील झाले होते. मात्र, ते बेपत्ता झाल्याने रेल्वे पोलीस, आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि नंदुरबार येथील पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाईक हे नंदुरबारमधील अक्कलकुह्हा तालुक्यातील ठानाविहीर येथे राहणारे आहेत तर चौधरी हे नंदुरबारमधील तळोजा तालुक्यातील चौगाव येथे राहणारे आहेत. या दोघांनाही आदिवासी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा येत नसून हे दोघेही बेपत्ता जाहले आहेत.