लोणी काळभोर - घरात कोणीही नाही, हा मोका साधून चोट्यांनी घरफोडी करून ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ४५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना कोरेगावमूळ (ता. हवेली) येथे घडली आहे.या प्रकरणी पंकज सुभाष येलमागे (वय ३७, रा. प्रयागधाम हॉस्पिटल, बिल्डिंग नंबर ८ रुम क्रमांक २४, ता. हवेली. मुळ रा. देवठाण, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज येलमागे यांचे वडील सुभाष व आई मंजूळा हे दोघे कोरेगावमुळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधेवस्ती येथे असलेल्या आनंदवास्तु अपार्टमेंट मध्ये दुस-या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये रहातात. त्यांची आई ३ फेब्रुवारी रोजी देवदर्शनासाठी चाळीसगांव येथें गेली.घरफोडी झाली असल्याचा संशय आलेने त्यांनी आपल्या आईला सदर घटना कळवली. त्यावेळी आईने त्यांना लाकडी कपाटाचे ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवले आहेत अशी माहिती दिली.चोरट्यांनी बंद घराचे दरवाज्याचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटातली ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले ४० हजार रुपये किमतीची २ तोळे वजणाची मोहनमाळ, ८० हजार रुपये किमतीचे प्रत्येकी २ तोळे वजणाची २ मोठी मंगळसूत्र, ४० हजार रुपये किमतीची प्रत्येकी १ तोळे वजणाची २ लहान मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे १ तोळा वजणाचे कानातील २ जोड, ४० हजार रुपये किमतीच्या २ तोळे वजणाच्या ४ बांगड्या असे एकूण ११ तोळे वजणाचे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला असल्याची फिर्याददिली आहे.घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त...दुपारनंतर सदर फ्लॅटला कुलूप लावून पंकज हे वडीलांनाआपल्या समवेत घरी घेऊन गेले. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पंकज घरी असताना त्यांना आईवडील रहात असलेल्या फ्लॅटमध्ये चोरी झाली असल्याची माहिती फोनवरून कळाली. ते तात्काळ आनंदवास्तु अपार्टमेंटमध्ये पोहोचले व पाहिले असता त्यांना आईवडील रहात असलेल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा त्याचा कोयंडा तुटलेल्या अवस्थेत असल्याचा आढळून आला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे दरवाजे उघडे व घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
घरफोडी करून अडीच लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 11:49 PM