दिल्ली पोलिसांनी दोन अशा महाठगांना पकडलं जे घटस्फोटीत महिलांना आपली शिकार बनवत होते. यातील एका व्यक्तीने स्वत: तीन लग्ने केली आहेत. दोघेही आरोपी घटस्फोटीत महिलांना परदेशात स्थायिक करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत होते. या दोघांच्या जाळ्यात घटस्फोटीत महिला अडकत होत्या, ज्यांना कॅनडा आणि इतर काही देशांमध्ये लग्न करून स्थायिक होण्याची लालसा होती.
'टीव्ही ९'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका घटस्फोटीत महिलेने पैसे देऊन आरोपी तिला कॅनडात स्थायिक करण्यात अपयशी ठरल्यानंतर महिलेने पोलिसात त्यांची तक्रार केली. चौकशीनंतर महिलेचे आरोप खरे असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. या लोकांनी देशातील किती महिलांना जाळ्यात घेऊन फसवलं याची पोलीस चौकशी करत आहेत.
या गॅंगचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांची एक टीम त्यांच्या मागे होती. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी पुरूषोत्तम उर्फ पंकज शर्माला पंजाबच्या अमृतसरमधून अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले. चौकशीतून समोर आलं की, या आरोपीने तीन लग्ने केली आहेत. लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी त्याने हे धंदे सुरू केले होते. तो घटस्फोटीत महिलांना फसवत होता.
परदेशात स्थायिक होण्यासाठी आतुर घटस्फोटीत महिलांसोबत तो आधी मैत्री करत होता. त्यानंतर कॅनडा किंवा दुसऱ्या देशांमध्ये सेटल करण्याचं स्वप्न दाखवत होता. जास्त घाईत असलेल्या महिलांना ते शिकार बनवत होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन आरोपी गप्प रहायचा.
तो सांगायचा की, परदेशात सेटल व्हायचं असेल तर पैसे खर्च करावे लागतील. अशात ज्यांना परदेशात जाण्याची घाई असायची अशा महिला त्यांच्याकडील सगळे पैसे आरोपीच्या हवाली करत होत्या. पण एका महिलेची फसवणूक झाली आणि तिने तक्रार केली. त्यानंतर त्यांचा भांडाफोड झाला.