मुंबई - NCB ने शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे शाहरुखच्या लेकाला मोठा दणका कोर्टाने दिला आहे. कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आता तीन रात्री कोठडीत काढाव्या लागणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या तीन रात्री एनसीबी कोठडीत असणार आहेत.
आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. तसेच त्याला पाहुणा म्हणून पार्टीत नेलं होतं, आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांचा कोर्टात दावा केला तर अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडलं असा एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दावा केला. कोर्टात सुनावणीदरम्यान क्रूझ ड्रग्ज पार्टीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा एनसीबीकडून दावा करण्यात आला, त्याबाबतच्या तपासासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळावी अशी मागणी एनसीबीने केली होती. आर्यनच्या चॅटमध्ये धक्कादायक माहिती मिळाल्याचा एनसीबीने दावा केला आहे.
एनसीबीच्या वतीनं अनिल सिंह युक्तिवाद करत आहेत. क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ९ दिवसांची एमसीबी कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्यनच्या फोनमधून आक्षेपार्ह बाबी हाती लागल्या असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं. 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेले काही फोटो आक्षेपार्ह आहेत. आर्यनच्या फोनमध्ये सापडलेल्या लिंक्स आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहेत,' असा दावा सिंह यांनी केला.