लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बहुचर्चित बिपीन गुलाबाचंद बाफना हत्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावली, तर ठोस पुराव्यांअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
बिपीन गुलाबचंद बाफना या महाविद्यालयीन तरुणाचे पाच संशयितांच्या टोळीने अपहरण करून खंडणी वसुलीसाठी त्याच्याच मोबाइलवरून त्याचे वडील गुलाबचंद बाफना यांना फोन करत एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी बिपीन याची निर्घृण हत्या करत गुन्ह्याचा पुरावा नष्ट केल्याची घटना जून २०१३ मध्ये उघडकीस आली होती. या खून खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होती. ही सुनावणी मंगळवारी पूर्ण होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी आरोपी चेतन यशवंत पगारे (वय २५), अमन प्रकटसिंग जट (२२) यांना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरले होते. या दाेघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
संशयित अक्षय ऊर्फ बाल्या सूरज सुळे, संजय रणधीर पवार, पम्मी भगवान चौधरी यांची न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी सुटका केली आहे.मूळ ओझर येथे राहणारे गुलाबचंद बाफना यांचा मुलगा बिपीन याचे ८ जून १०१३ मध्ये अपहरण करुन नंतर खून करण्यात आला होता.
nया गुन्ह्यात सराईत गुन्हेगार अमन प्रकटसिंग जट व चेतन पगारे यांच्याविरुद्ध शास्त्रोक्त पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.n त्याआधारे त्यांना न्यायालयाने दोषी धरले आहे. या खटल्यात न्यायालयाने एकूण ३५ साक्षीदार तपासले. शुक्रवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
शेतात होता मृतदेहnपंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ जून २०१३ राेजी एका शेतात बिपीन बाफना याचा मृतदेह आढळून आला होता. nयाप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून खटला दाखल केला होता. सरकारी पक्षातर्फे ॲड. अजय मिसर यांनी काम पाहिले.