पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:47 PM2021-08-18T19:47:15+5:302021-08-18T19:48:22+5:30
Crime Case : गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली.
मुंबई : गुन्हे शाखेने ८ देशी पिस्तुलांसह ८ जीवंत काडतुसांची विक्री करणाऱ्या मध्यप्रदेशच्या दुकलीला मंगळवाऱी अटक करण्यात आली आहे. यासीन रमजान खान (२०), अजहर आझम खान (२२) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. दुकली तेथे येताच त्यांच्या संशयास्पद हालचाली पथकाच्या नजरेत पडताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ८ देशी पिस्तुलासह ८ जीवंत काडतुसे मिळून आली आहेत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक दुकलीला २३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठड़ी सुनाविण्यात आली आहे. दोघेही मध्यप्रदेशचे रहिवासी आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
Mumbai Crime Branch unit arrested two people from Vikhroli area and seized eight country-made pistols and eight live bullets from their possession. Both of the have been sent to Police custody till 23d August. pic.twitter.com/TxJN3b89pC
— ANI (@ANI) August 18, 2021