लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) सतत दोन दिवस दोन ठिकाणी छापे मारून १७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ड्रग) पावडर जप्त केले. एमडीच्या तस्करीत आणि विक्रीत गुंतलेल्या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.हसनबागमध्ये राहणारा एक आरोपी एमडीच्या तस्करीत गुंतल्याची माहिती गुन्हे शाखेला कळाली. त्यावरून एनडीपीएसच्या पथकाने शनिवारी दुपारी १.५५ वाजता हसनबागमधील कादरिया मदरसाजवळ राहणारा पक्या ऊर्फ मोहम्मद शाहनवाज मोहम्मद आरिफ (वय २२) याच्या घरी छापा घातला. पोलिसांनी त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील नंबर नसलेल्या व्हेस्पा मोपेडमध्ये ४ ग्रॅम २५ मिलीग्रॅम एमडी पावडर मिळाले. पक्याकडून हे एमडी पावडर, दोन मोबाईल आणि व्हेस्पा असा एकूण ८८,७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.शुक्रवारी पहाटे पोलिसांनी यशोधरानगरातील हमीदनगरात राहणारा मोहम्मद आमिर मुकीम मलिक (वय २९) याच्याकडे छापा मारून त्याच्याकडून १२ ग्रॅम ३६ मिलीग्राम एमडी तसेच मोबाईल जप्त केले.गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसच्या पथकाने ही कारवाई केली. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे नंदनवन आणि यशोधरानगर पोलिसांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात दोन एमडी तस्करांकडे छापे : १७ ग्रॅम ड्रग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 10:19 PM
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) सतत दोन दिवस दोन ठिकाणी छापे मारून १७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ड्रग) पावडर जप्त केले. एमडीच्या तस्करीत आणि विक्रीत गुंतलेल्या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
ठळक मुद्देहसनबागमधील पक्यासह दोघांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई