पिंपरी : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे, तर पिंपरीतील भाटनगर येथून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भोसरीतून १६ वर्षाच्या मुलीला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दोन दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या तीन घटना घडल्या असून भोसरीतून एका १६ वर्षाच्या मुलाचेसुद्धा अज्ञाताने अपहरण केले आहे. एकाचवेळी घडलेल्या अपहरणाच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतून मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास अज्ञात व्यकतीने फूस लावून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेले. तर भाटनगर येथे गॅस सिलिंडरचे वाहन आले, ते पाहण्यासाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षांची तरूणी पुन्हा घरी परतली नाही. कोणीतरी तिला आमिष दाखवुन पळवून नेले आहे. ही मुलगी महिला मंडळ संचलित स्वाधार केंद्रात राहण्यास होती. कोणीतरी अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले आहे. दापोडीतील सरस्वती अनाथाश्रमातून मंगळवारी १२ वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण झाले आहे.
..........................
अनाथाश्रमातील मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेआश्रमात वास्तव्यास असलेल्या मुली सद्यस्थितीत सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन महिन्यांपुर्वी भोसरीतील शासकीय वसतिगृहातून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यानंतर चिंचवडगावातील गुरूकुल या आश्रमातून दोन मुली बेपता झाल्याची घटना घडली आहे. आता अपहरण झालेल्या दोन मुली दोन वेगवेगळ्या आश्रमात राहण्यास होत्या. आश्रमातून मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात चिंतेचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.