शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

दोन अल्पवयीन मुलींची बलात्कार करून हत्या; आत्महत्या भासवण्यासाठी झाडाला लटकवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 7:52 AM

या प्रकरणी भरपाई व न्यायाची मागणी करत मुलींच्या कुटुंबीयांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : येथे दोन दलित अल्पवयीन बहिणींवर नराधमांनी बलात्कार करून नंतर हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील निघासन भागात बुधवारी ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी येथे दिली. घटनेमुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली असून, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी भरपाई व न्यायाची मागणी करत मुलींच्या कुटुंबीयांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. राज्य शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिल्याचे सांगण्यात येते. जुनैद आणि सोहेलची या दोन बहिणींशी मैत्री होती. हे दोघे शेजारच्या लालपूर गावचे रहिवासी आहेत.  या दोघी बुधवारी दुपारी त्यांच्यासोबत घराबाहेर पडल्या होत्या, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आईने सांगितला घटनाक्रमआपल्या मुलींची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची तक्रार मुलींच्या आईने बुधवारी रात्री निघासन कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. शेजारी राहणारा छोटू व अन्य काही युवक दुचाकीवरून माझ्या झोपडीत आले व त्यांनी मुलींचे अपहरण केले. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यातील एकाने मला लाथ मारली आणि ते मुलींना दुचाकीवरून गावाबाहेरील शेताकडे घेऊन गेले, असा आरोप त्यांनी केला. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील झाडाला या मुलींचे लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह नंतर आम्हाला आढळून आले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

आरोपीकडून पिस्तूल व गोळ्या जप्तआरोपी जुनैद हा लपून बसला होता. पोलीस आज सकाळी पकडण्यासाठी आल्यानंतर त्याने  पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत तो जखमी झाला, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले. जुनैदकडून गावठी पिस्तूल व गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

‘त्या’ घटनेची आठवणही घटना २०१४ मधील बदायू सामूहिक बलात्कारासारखी आहे. बदायूत १४ आणि १५ वर्षांच्या दोन दलित मुलींची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले होते.