मुंबई : जिलेटीन कार प्रकरणात एपीआय सचिन वाझे याचा पाय आणखी खोलात अडकत जात आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्याच्याकडील लँड क्रूझर व मर्सिडीज कार जप्त केली. आतापर्यंत वाझेच्या एकूण ५ आलिशान गाड्या एनआयआयने ताब्यात घेतल्या. (Two more expensive Vaze's vehicles were seized)स्फाेटक कार प्रकरणातील प्रमुख आरोपी वाझे हाच २५ फेब्रुवारीला पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवीत होता. मुलंड चेक पोस्ट नाक्यावरून ती मध्यरात्री १.२० वाजेच्या सुमारास गेली होती. वाझे ती चालवीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. वाझेला विविध प्रकारची गाड्या वापरण्याची हौस असून, त्याच्याकडे एकूण १९ गाड्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्या अनुंषगाने त्या कारची माहिती घेतली जात आहे. लँड क्रुझरमधून मनसुख हिरेनचा प्रवास एनआयएने जप्त केलेल्या लँड क्रुझरमधून वाझे व मनसुख हिरेन यांनी एकत्र प्रवास केल्याचे स्पष्ट झाले. हिरेन हे त्याचे मित्र होते. वाझे त्यांना व्यवसायात मदत करीत असल्याने अनेकदा ते एकत्र भेटत असत, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. २६ फेब्रुवारीला लँड क्रुझरमधून त्यांनी एकत्र प्रवास केला. वाझे गाडी चालवीत होता. त्याच्या बाजूला हिरेन असल्याचे फुटेज सापडले आहेत.
वाझेच्या आणखी दोन महागड्या गाड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:29 AM