नालासोपारा : पूर्वेकडील आचोळे रोडवरील एका हॉटेलसमोर ३२ ग्रॅम कोकेनसह एका नायजेरियनला १६ आॅगस्टला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस तपासात त्याची दोन नावे आणि दोन पासपोर्ट असल्याचे समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ तारखेला पकडलेल्या नायजेरियन आरोपीने त्याचे नाव त्या वेळी लायन उर्फ लायसन इमॅन्यूअल (५७) असे सांगितले होते. पण तपासात त्याचे खरे नाव संडे ओकोईल इमॅन्यूअल (४४) असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे मार्टिन ल्युनूस नावाचा २०१० मध्ये बनवलेला बनावट पासपोर्ट सापडला आहे. तर खºया नावाचाही पासपोर्ट २००८ मध्ये बनवला आहे.हे दोन्हीही पासपोर्ट वापरून त्याने परदेशवारीही केलेली आहे. २००४ पासून तो भारतात वास्तव्यासअसून सध्या तो नालासोपारा पश्चिमेकडील पोलीस ठाण्याच्या मागील परिसरात राहत होता.
२०११ मध्ये एका मराठी महिलेशी लग्न केले असून त्याला आता दोन मुली आहेत.या गुन्ह्यात ज्यूस नावाचा साथीदार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.तपासात समोर आलेल्या माहितीमुळे बनावट पासपोर्टची मोठी लिंक एलसीबी पोलिसांना मिळाली असून आता त्याचा शोध घेत मोठे रॅकेट उधळणार असल्याचे सूत्रांकडून कळते. नालासोपाºयात राहणारे अनेक नायजेरियन बनावट पासपोर्ट बनवून राहत असतील,असा पोलिसांनी संशय व्यक्तकेला आहे.