राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : गोवा येथून ट्रक द्वारे अनधिकृतपणे गोवा बनावटीचे मद्य घेऊन जाणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे ही कारवाई करण्यात आली आहे. महेश श्रीकृष्ण सूर्यवंशी, वय 24 वर्ष, रा.चिंचोळे आवार, नाशिक, अनिल मोतीराम गायकवाड, वय - 36 वर्षे, रा. ठी. वडोदरा, गुजरात अशी आरोपीची नावे असून त्यांच्याकडून २३ लाख १७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोवा बनावटीचे मद्य हे बडोदा, गुजरात येथे विक्रीसाठी नेले जात होते.
गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे मद्य हे मुंबई गोवा महामार्ग द्वारे मुंबई, गुजरात राज्यात अवैधपणे नेले जाते. गोवा राज्यातून अशीच अवैध बनवत दारू मुंबई गोवा महामार्ग वरून नेणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागाचे पोह जितेंद्र चव्हाण यांना गुप्त बातमीदारतर्फे कळली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावर अनिकेत हॉटेल, कोलाड येथे स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचला होता.
बातमी दाराने सांगितलेल्या माहितीनुसार भारत बेन्झ कंपनीचा ट्रक नं. जिजे ०६/ बिवी ९७१७ हा आला असता दबा धरून बसलेल्या पथकाने ट्रक अडवला. ट्रक ची तपासणी केली असता, गोवा बनावटीची ७ लाख ७० हजार रुपये किमतीचे रॉयल ब्लू व्हिस्की विदेशी बनावटीच्या दारूचे एकुण ११०० बॉक्स आढळले. पथकाने आपला खक्या दाखविल्यानंतर आरोपी महेश सूर्यवंशी आणि अनिल गायकवाड यांनी गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बडोदा येथे नेत असल्याचे कबूल केले. त्यानुसार ७ लाख ७० हजार मद्यासह १६ लाख किमतीचा ट्रक असा २३ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोउपनि धनाजी साठे, पोह जितेंद्र चव्हाण, पोहव विकास खैरनार, पोना अक्षय जाधव, पोशि अक्षय सावंत, व सायबरचे पोशि अक्षय पाटील या पथकाने केली आहे.