जळगाव - बॅँकेच्या लॉकरमध्ये दोन गावठी पिस्तूल व ४८ काडतूसे आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेग मिर्झा लतीफ शेख (रा.इंडीया गॅरेज रोड, जळगाव) असे या गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव पीपल्स बॅँकेच्या रिंगरोड शाखेत १४ ग्राहकांनी गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या लॉकरचा वापरच केला नव्हता. या ग्राहकांना बॅँकेने नोटीसा बजावल्या. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने १४ ग्राहकांची यादी प्रसिध्द केली होती. त्यानंतर दोन ग्राहकांनी लॉकर उघडले होते. १२ ग्राहकांनी या लॉकरकडे पाहिलेही नाही. त्यामुळे मंगळवारी या १२ ग्राहकांचे लॉकर उघडण्यात आले. त्यात मिर्झा यांच्या लॉकरमध्ये दोन गावठी पिस्तूल व ४८ काडतूसे आढळून आली. बेग हे सेवानिवृत्त कर्मचारी असून दहा वर्षापूर्वी लॉकर सुरु केले तेव्हा त्यांचा वय ७३ होते. दिलेल्या पत्त्यावर ते आता राहत नाहीत. बॅँकेच्या नोटीसाही परत आल्या आहेत. त्यामुळे शाखा व्यवस्थापक सुधीर भलवतकर यांनी जिल्हा पेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बेग हे कुठे आहेत, हयात आहेत की नाहीत? याची कोणालाच माहीती नाही.
बॅँक लॉकरमध्ये आढळले दोन पिस्तूल, ४८ काडतुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 12:10 AM