Crime News : नोएडाच्या सेक्टर-58 मधील पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी दोन भावांना अटक केली आहे. दोन्ही भाऊ मुलींचे आवाज काढून लोकांना फसवत होते. पोलिसांनी गुन्हेगारांना मुलीचा आवाज काढण्यास सांगितला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण.
पोलिसांनी दोन भाऊ केतन अरोरा आणि चिराग अरोरा यांना अटक केली होती. दोन्ही भाऊ बेरोजगार तरूणांना जिगोलोची नोकरी देण्याच्या नावावर फसवत होते. पोलिसांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडीओ हा एक सायबर फसवणुकीचा आहे. हे तरूण मुलींचा आवाज काढून लोकांची फसवणूक करत होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या 5 मार्चला एका पीडितने तक्रार दाखल केली होती की, त्याला एक स्पा सेंटर उघडण्याच्या नावावरून एक लाख 83 हजार रूपयांनी फसवण्यात आलं. चौकशी दरम्यान समोर आलं की, दोन भाऊ केतन अरोरा आणि चिराग अरोरा फेसबुक आणि इन्स्टासारख्या सोशल मीडिया साइट्सवर फेस पेज तयार करत होते. ज्याद्वारे ते लोकांकडून तरूणी बनून नंबर घेत होते आणि फोनवर मुलीच्या आवाजात बोलत होते. ते तरूणांना जिगोलोची नोकरी देण्याचं सांगत होते. मुलींचा आवाज ऐकून लोक त्यांच्या जाळ्यात अडकायचे आणि त्यांच्याकडून पैसे घेत होते.
पोलिसांनी सांगितलं की, दोन भाऊ मिळून लोकांना फसवत होते. हे दोघेही दोन वर्षापासून अॅक्टिव होते. दोघेही राज नगर एक्सटेंशन येथील आपल्या घरातूनच सगळं काम करत होते. आरोपींनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं की, त्यांच्यासोबतही अशी घटना झाली होती. पोलिसांनी त्यांची पाचही बॅंक खाती सीझ केली आहेत. त्यांनी किती लोकांना आणि किती रूपयाने फसवलं याची चौकशी सुरू आहे.