इंटॅलिजन्स इनपुटच्या आधारावर चेन्नई एअर कस्टमने रमत्नमपुरममध्ये राहणाऱ्या मगरूब अकबर्ली आणि चेन्नईला राहणाऱ्या जुबेन हसन यांना अटक केली हे. दोघेही दुबईहून आले होते. यांच्या हेअरस्टाइलवर संशय आल्याने त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यांची झडती घेतली तर त्यांच्या केसांच्या वीगमध्ये २ गोल्ड पेस्ट पॅकेट सापडले. यात ५९५ ग्रॅम सोनं आहे.
तेच दुसऱ्या केसमध्ये तिरूचिरापल्ली येथे राहणाऱ्या ब्लू गणेशनकडे गोल्ड पेस्ट बंडल सापडलंय ज्यात ६२२ ग्रॅम सोनं आहे. तो सुद्धा सेम फ्लाइटने दुबईहून आला होता. याआधी शनिवारी अंबाझहगन नावाच्या व्यक्तीलाही एअरपोर्टच्या एक्झिटवर अटक करण्यात आली होती. त्याच्याकडेही गोल्ड पेस्ट सापडलं. याचं वजन १.५ किलो इतकं होतं. यात १.३३ किलो वजनाचं सोनं होतं. ज्याची किंमत ६२ लाख रूपये होती.
तसेच चेन्नईत राहणाऱ्या एका थामिन अन्सारी नावाच्या गोल्ड रिसीव्हरलाही अटक करण्यात आली. तसेच एका वेगळ्या केसमध्ये इंडिगोच्या फ्लाइटमधून १० तोळे सोनं ताब्यात घेण्यात आलं. हे सोनं एअरक्राफ्टच्या सीटमध्ये लपवण्यात आलं होतं. याचं वजन ९३३ ग्रॅम होतं. तर याची किंमत ४३ लाख ३० हजार इतकी होती.
त्यासोबतच शुक्रवारी रमंथपुरमला राहणाऱ्या सैय्यद अहमदुल्ला, सलेममध्ये राहणाऱ्या संतोष सेल्वम आणि चेन्नईला राहणाऱ्या अब्दुल्लाह यांना अटक करण्यात आली होती. हे दुबईहून आले होते. त्यांचीही हेअरस्टाइल संशयित वाटली. त्यांना चेक केलं तर वीगमधून ३ गोल्ड पॅकेट सापडले. याचं एकूण वजन २४१० ग्रॅम होतं. यात एकूण २.०८ किलो सोनं होतं. ज्याची किंमत ९६.५७ लाख इतकी होती.