आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेंड्याच्या शिंगासह दोन तस्करांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोहीम राबवताना गेंड्याच्या शिंगांसह दोन तस्करांना पकडले आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस व वनविभागाने मंगळवारी सायंकाळी चार वाजता मौबंध येथील एका हॉटेलवर छापा टाकला. या हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्या दोन तस्करांना पोलिसांनी गेंड्याच्या शिंगासह अटक केली. 42 वर्षीय सूर्य हजारिका आणि 24 वर्षीय बलुराम भुईया अशी तस्करांची नावे असून, बारबम चांगी येथील रहिवासी आहेत.गेंड्याची शिंग आणि दुचाकी जप्तपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मौबंध येथील एका हॉटेलमध्ये चहा घेत होते आणि त्याचवेळी पोलीस आणि वनविभागाचे लोक घटनास्थळी पोहोचले. नंतर या दोघांनाही ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी गेंड्याचे शिंग आणि दुचाकी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गेंड्याच्या शिंगाचे वजन सुमारे एक किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या दोन्ही तस्करांची कसून चौकशी करत आहेत.
गेंड्याच्या शिंगाची चोरी करून 2 तस्कर लपले होते हॉटेलात, असे उघड झाले रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 2:08 PM