नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. निर्दयी मुलांनी आपल्या आईचे कपडे फाडले अन् तिला रस्त्यावर फरफटत नेऊन बेदम मारहाण केली आहे. मारहाणी दरम्यान महिला जोरजोरात ओरडत होती. तसेच मुलांना मारू नका अशी विनवणी करत होती. पण दारूच्या नशेत असलेल्या मुलांनी तिचं काहीच ऐकलं नाही. ते तिला बेदम मारहाण करतच राहिले. लोकांची मोठी गर्दी परिसरात जमा झाली होती. याच दरम्यान गावातील काही महिलांनी वृद्ध महिलेची मुलाच्या तावडीतून सुटका केली आहे.
मध्य प्रदेशच्या आगर-मालवा जिल्ह्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत दोन मुलांनी आपल्या 80 वर्षीय आईला बेदम मारहाण केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी मारहाणी दरम्यान आपल्याच आईचे कपडे देखील फाडले त्यानंतर घरातून फरफटत ते त्यांनी वृद्ध आईला रस्त्यावर आणलं आणि तिथे गावकऱ्यांसमोर बेदम मारहाण करायला सुरुवात केली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या महिला बाहेर आल्या आणि त्यांनी महिलेला वाचवलं.
घटनेचा माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. तसेच वृद्ध महिलेला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी हरीश जेजुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या मुलांनी बेदम मारहाण केली. माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. धक्कादायक घटनेने परिसरात एकट खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! हुंड्यामध्ये कार आणि 5 लाख न दिल्याने सासरचे झाले हैवान; विवाहितेवर 12 जणांकडून बलात्कार
देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हुंड्यामध्ये एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून सासरची मंडळी हैवान झाली. विवाहितेवर कुटुंबातील 12 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.