मुसळधार पावसामुळे मुंबईत दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असताना आज शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीतील बॉम्बे सिटी हॉस्पिटलच्या मागे दुमजली घर कोसळून 4 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत. (two story home collapsed in Mumbai, 4 killed, 12 injured.)
मोहम्मद परवेज मोहम्मद जाबीर शेख यांचे अहिल्याबाई होळकर रोडवर दोन मजल्यांचे घर होते. ते कोसळल्याने परवेज यांचे वडील जाबीर रेहमतुला शेख (80), मुलगी नेहा उर्फ मुशिरा मोहमद परवेज शेख (24) आणि परहीन परवेझ शेख (20), पत्नी शमशाद बेगम (50) यांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जखमींवर राजावाडी, सायन, बॉम्बे सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर या घराच्या बाजुच्या दोन घरांना तडे गेल्याने ती घरेदेखील पाडण्यात आली आहेत.