लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : बकऱ्या घेऊन येत असलेल्या ट्रकने कोळसा घेऊन जात असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. त्यात ट्रकमधील अंदाजे १०० बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक गंभीर जखमी झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी शिवारात गुरुवारी (दि. २३) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.डुमरी (ता. पारशिवनी) शिवारात वेकोलिची कोळसा सायडिंग आहे. त्या सायडिंगमधून एमएच-४०/एन-४८७७ क्रमांकाचा ट्रक कोळसा घेत महामार्गाच्या दिशेने येत होता. त्याचवेळी एमएच-२०/एटी-२९१२ क्रमांकाचा ट्रक मध्य प्रदेशातून बकऱ्या घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता.या दोन्ही ट्रकची टी-पॉईंटजवळ आपसात जोरदार धडक झाली. त्यात बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, ट्रकमधील अंदाजे १०० बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी ट्रकचालकाचे नाव कळू शकले नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत बकऱ्या व दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. शिवाय, जखमी ट्रकचालकास उपचारासाठी कन्हान येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दोन ट्रकची टक्कर : १०० बकऱ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:38 PM
बकऱ्या घेऊन येत असलेल्या ट्रकने कोळसा घेऊन जात असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. त्यात ट्रकमधील अंदाजे १०० बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील डुमरी शिवारातील घटना