सोलापूर : वापरण्यासाठी दिलेली दुचाकी मित्राने परस्पर खासगी सावकाराकडे गहाण ठेवल्याप्रकरणी मित्रानेच मित्रावर गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी संतोष महादेव शिवशरण (वय ३०, रा. सम्राट चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर हरी तिवारी ( रा. विजापूर) यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवशरण यांच्या ओळखीतील आरोपी सागर याने डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची दुचाकी चार दिवसांकरिता वापरण्यासाठी घेऊन जातो असे सांगून त्यांच्याकडून नेले व ती गाडी सागर याने फिर्यादी यांची दुचाकी विजापूर येथील सावकाराकडे गहाणवट ठेवली. परंतु अद्याप पर्यंत फिर्यादी यांची दुचाकी परत न दिल्याने फिर्यादीच्या सहमती शिवाय परस्पर अपहार केला आहे, अशी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सागर तिवारी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करीत आहेत.