घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 03:32 PM2022-10-11T15:32:38+5:302022-10-11T15:32:50+5:30

Kerala Crime News : मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती.

Two women killed in human sacrifice in Thiruvalla kerala | घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा!

घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा!

Next

Kerala Crime News : केरळच्या त्रिरूवल्लामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे घरात धन आणि संपत्ती यावी म्हणून दोन महिलांचा बळी देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीसहीत 3 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनुसार, आरोपींनी आधी महिलांचा गळा कापून हत्या केली आणि नंतर त्यांना दफन केलं.

मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. पोलीस जेव्हा दोघींच्या बेपत्ता असण्याच्या केसचा तपास करत होते तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांना समजलं की, महिलांचा बळी देण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी  त्रिरूवल्ला येथे राहणारा भगावल सिंह आणि त्याची पत्नी लीला व एक इतर आरोपी शिहाब याला अटक केली आहे. तिघांची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनुसार, महिलांना एरनाकुलम येथून  तस्करी करून आणण्यात आलं होतं. दोघींचीही हत्या त्रिरूवल्लामध्येच करण्यात आली. शिहाबवर कथितपणे महिलांना फूस लावून त्रिरूवल्लात आणल्याचा आरोप आहे. भगावल सिंह आणि त्याची पत्नी लीलावर दोन महिलांचा बळी देण्याचा आरोप आहे. 

पोलीस कमिश्नर सी एच नागाराजू यांनी सांगितलं की, मानवी बळी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. आम्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. महिलांचं शीर कापून त्यांची हत्या करण्यात आली.  त्यांचे मृतदेह पठानमथिट्टाच्या एलंथूरमध्ये दफन करण्यात आले. ते म्हणाले की, याप्रकरणी आणखीही काही लोकांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

कमिश्नर म्हणाले की, महिलांचा बळी देण्याचा मुख्य उद्देश धन, संपत्ती मिळवणे हा होता. त्यांनी सांगितलं की, कपल आणि एजंटने आपले गुन्हे कबूल केले आहेत. पोलिसांनुसार, कपल आर्थिक संकटाचा सामना करत होतं. त्यांनी देवाला खूश करण्यासाठी या संकटातून बाहेर पडण्यासाठी महिलांचा बळी देण्याचं ठरवलं होतं.  

Web Title: Two women killed in human sacrifice in Thiruvalla kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.