कल्याण - मोबाईल चोर असल्याच्या संशयावरून दोघांना विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. ही १९ फेब्रुवारी दुपारची घटना आहे. यासंदर्भातील व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सलमान शेख यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे तरुणांना मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. ज्या तरुणांना मारहाण झाली आहे त्या तरुणांचा काही पोलीस रेकॉर्ड आहे का? याचा तपास सुद्धा पोलीस करत आहेत.