मुंब्राः लाचलुचपत प्रतिबंधित विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन व्यापा-याकडे एक लाखांची खंडणी मागितलेल्या दोन तरुणांना मुंब्रापोलिसांनीअटक केली.
मुंब्र्यातील कौसा भागातील सिमला पार्क परीसरातील मिनार रेसीडेन्सी मध्ये रहात असलेल्या मुबशीर शेख यांचे रशिद कम्पाउंड येथील हशमत चौकात सुपारी विक्रीचे दुकान आहे.शनिवारी रात्री या दुकानात जाऊन अलमदर पुन्जा आणि जयेश सोनावणे यांनी ते नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधित विभागातील अधिकारी असल्याचे शेख यांना सागितले.तसेच तुमच्या दुकानामध्ये गुटख्याची विक्री होत असल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून,यातून वाचायचे असल्यास एक लाख रुपये द्या.अशी मागणी केली.याबाबत शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरुन पोलिसांनी दोघांना अटक केली. अंगझडती मध्ये त्यांच्याकडे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे तसेच नँशनल सिक्युरिटी आणि करप्शंन क्राईम प्रिवेन्टिव्ह ब्रिगेडची ओळखपत्र आढळून आली.पोलिसांनी ती ताब्यात घेतली.