शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

इन्स्टाची ओळख, बलात्कार, अन् न्युड व्हिडिओ; २१ वर्षीय तरुणीचं सर्वस्व लुटले

By प्रदीप भाकरे | Published: January 22, 2023 7:56 PM

जुन्या प्रियकराकडून व्हायरल! एक फुल, दो माली; प्रियकरांचा प्रताप, ती गावी परतल्यावर दोघांमध्ये व्हॉटसॲप चॅट व व्हिडिओ कॉलिंग होऊ लागले. आरोपी हर्षल हा नेहमी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी अश्लील कृती करीत होता.

अमरावती: दुसऱ्या प्रियकरासोबत इन्स्टावर झालेली ओळख बलात्कारापर्यंत पोहोचली तर ते संबंध तोडण्यासाठी पहिल्या प्रियकराने पिडिताचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. पहिल्या प्रियकराने त्याने काढलेले पिडिताचे व्हिडिओ तिच्या दुसऱ्या प्रियकरासह तिला व तिच्या मैत्रिणीला पाठविले. १७ फेब्रुवारी २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी २१ जानेवारी रोजी रात्री आरोपी हर्षल चंद्रकांत बाभुळकर (२१, रा. रामनगर, वर्धा) व आकाश सिंघाने (रा. अंजनवती, ता. धामणगाव रेल्वे) यांच्याविरूध्द बलात्कार, बदनामी, धमकी तथा आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. यातील हर्षल बाभुळकरने पिडिताचे व्हिडिओ व्हायरल केले. तथा आकाश सिंघाणे याने तिनदा तिचे सर्वस्व लुटले. २१ वर्षीय तरूणी फेब्रुवारी २०२२ मध्ये वर्धा येथे गेली असता, तिची हर्षल बाभुळकर सोबत ओळख झाली. ती गावी परतल्यावर दोघांमध्ये व्हॉटसॲप चॅट व व्हिडिओ कॉलिंग होऊ लागले. आरोपी हर्षल हा नेहमी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी अश्लील कृती करीत होता. त्यामुळे तरूणीने ऑक्टोबर २०२२ पासून त्याच्यासोबत बोलणे बंद केले व त्याच्या मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला.

तीनदा बळजबरी

दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये त्या तरूणीची आकाश सिंघाणे याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. तेव्हापासून ती त्याच्याशी मोबाईल कनेक्ट होती. २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास आकाशने तिला धामणगाव बस स्टॉपहून तरोडा फाट्यावरील एका शेतात नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोनदा त्याने तिच्यावर बळजबरी केली.

व्हॉट्सॲप हॅक केले

आकाश सिंघाणे याने पिडित तरूणीचे व्हाॅट्सअप हॅक करून हर्षल बाभुळकर याचा संपर्क क्रमांक जाणून घेतला. त्याचेसोबत मोबाईलवर बोलणे सुरू केले. त्यानंतर हर्षल बाभुळकर याने तरूणीला तुझे आकाशशी संबंध आहे, अशी धमकी देऊन तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला धामणगाव येथे भेटण्यात बोलावले. त्यावर पिडिताने नकार दिला असता हर्षलने ते पिडिताचे व्हिडिओ तिच्यासह तिची मैत्रीण व अन्य एकाला पाठवून व्हायरल केले.आरोपी हर्षलने व्हिडिओ व्हायरल केले, तर आकाश नामक आरोपीने तिच्याशी बळजबरी केली, अशी तक्रार नोंदवून घेण्यात आली. आरोपींचा शोध सुरू आहे. पथक पाठविले आहे - हेमंत चौधरी, ठाणेदार, तळेगाव दशासर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी