बारामती : गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘यु टर्न’ घेत बलात्कार झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधित महिलेने सादर केले. हातऊसने घेतलेल्यापैशाच्या कारणावरून बलात्काराची खोटी फिर्याद या महिलेने वालचंदनगर पोलीस ठाण्यात दिली होती. बारामती सत्र न्यायालयाने या महिलेला फटकारत पोलिसांना तिच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. इंदापुर तालुक्यातील एका गावातील विवाहितेने वालचंदनगर पोलिसठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार तिने व तिच्या पतीने या आरोपीकडून हात ऊसने पैसे घेतले होते. मात्र, हे पैसे मुदतीत न दिल्याने त्याने पैशाचा तगादा लावत फियार्दी विवाहितेकडे शारिरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. दि. ७ जून रोजी रात्री साडे नऊ वाजता तिच्या घरी अनाधिकाराने घुसत पती घरात नसताना तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने फिर्यादीमध्ये नमुद केले होते. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करीत वालचंदनगर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.मात्र, त्यानंतर तपासादरम्यान या विवाहितेने ‘यू टर्न ’ घेत प्रतिज्ञापत्राद्वारे बलात्कार झाला नसल्याचे सांगत केवळ पैशाचा तगादा लावत असल्याने फिर्याद दिल्याचे सांगितले.या प्रकरणातील आरोपीने बारामती सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हा न्यायाधिश आर. आर. राठी यांच्यासमोर सुुरु होती. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल प्रसन्न जोशी यांनी संबंधित फिर्यादी महिलेने दिलेला मूळ जबाबातील विसंगती. नवे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर आणले.संबंधित महिलेने खोटा गुन्हा दाखल करुन पोलीस यंत्रणा व न्याय यंत्रणेचा वेळ व पैसा खर्च केल्याचे अॅड. जोशी यांनी निदर्शनास आणले.त्यावर न्यायाधीश राठी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा सशर्त जामिन न्यायाधिश मंजूर केला. विनाकारण न्यायालय व पोलिस यंत्रणेचा वेळ खर्ची घातल्याचे निरीक्षण नोंदवत तिच्याविरोधात कडक कारवाई करावी, असे आदेश देखील त्यांनी दिले.अशा प्रकरणांमध्ये आरोपीला विनाकारण न्यायासाठी झगडावे लागल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.———————————————
धक्कादायक ! बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यावर विवाहित महिलेचा ' यू टर्न ',इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 1:02 AM
खोटी फिर्याद देणाऱ्या विवाहितेवर कडक कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश
ठळक मुद्देगुन्हा दाखल झाल्यानंतर बलात्कार झाला नसल्याचे विवाहितेचे प्रतिज्ञापत्र