नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. चहावाला अचानक कोट्यधीश झाला. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये 5 कोटी आले. तरुणाने नवं घर खरेदी केलं पण सत्य समजताच हैराण व्हाल. पायाखालची जमीनच सरकेल. काही लोकांनी चहा विक्रेता राहुल मालवीय याला फनी रील्स आणि रिअल इस्टेटचे काम सांगून महिन्याला 25 हजार रुपयांचं आमिष दाखवलं. त्याला रील बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. इंदूरमधील एका हॉटेलमध्ये या तरुणाला 7 दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्याची 4 बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. 7 दिवसांनी तो तरुण पुन्हा उज्जैनला आला आणि त्याने कामाला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या खात्यात लाखोंचे व्यवहार होऊ लागले.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला याबाबत माहिती दिली असता त्याने त्याला ट्रेनिंग देणाऱ्या लोकांना याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी तरुणाला तुला यातून काही पैसे हवे असतील तर घे. हे ऐकून त्या मुलाने 18 लाख रुपये काढून घेतले आणि नवीन घरी घेतलं. या घरात तो आईसोबत राहू लागला. घर विकत घेतल्यानंतर मुलाचा त्रास वाढला आणि जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली तेव्हा त्याने मित्रासह पोलीस ठाणे गाठले आणि सीएम हेल्पलाईनवर तक्रार केली. यानंतर गदारोळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या खात्यात रोज 90 लाखांचे पेमेंट येऊ लागल्याने तरुण चक्रावून गेला. हळूहळू त्यांच्या खात्यात 5 कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर झाली.
एसएसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी याप्रकरणी तपास सीएसपी हेमलता अग्रवाल यांच्याकडे सोपवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच उघड करून दोषींवर कारवाई केली जाईल. राहुल मालवीय असं या तरुणाचं नाव आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो त्याची आई जयश्री मालवीय यांच्यासोबत राहतो. तो एका डोळ्याने पाहू शकत नाही. गेल्या वर्षी दिवाळीच्या दहा दिवस आधी राहुलला सौरभ नावाचा माणूस चहाच्या स्टॉलवर सापडला. तो इंदूरचा रहिवासी आहे.
तरुणाच्या साधेभोळेपणाचा फायदा घेत सौरभने त्याला रील्स बनवणे आणि रिअल इस्टेट सोशल मीडियावर टाकण्याचे काम असल्याचं सांगितलं. चहाच्या दुकानात दरमहा हजारो रुपये कमावता येत नसल्याचे त्याने सौरभला सांगितले. माझ्यासोबत इंदूरला या, प्रशिक्षण घ्या आणि महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवा. सोशल मीडियावर फक्त मजेदार व्हिडीओ पोस्ट करण्याचं काम असल्याचं सांगितलं. राहुल जाळ्यात अडकला आणि 7 दिवसांसाठी इंदूरला गेला. त्यांची खाती उघडली गेली आणि लाखो रुपये ट्रान्सफर होऊ लागले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांनी हेल्पलाईनची मदत घेतली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.