UK Crime News : यूकेतील एका सिरिअल किलर मेल नर्सला चार रूग्णांना हवेचं इंजेक्शन देऊन मारल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. विलियम डेविस नावाच्या या मेल नर्सने एका प्रसिद्ध हॉस्पिटलमद्ये हार्टचं ऑपरेशन करून रिकव्हर होत असलेल्या लोकांना तडपवत पडपवत मारलं. वकील म्हणाले, 'त्याला लोकांना मारणं आवडत होतं'. कोर्टाने डेविसला चोर लोकांच्या हत्येचा दोषी मानलं. त्याला आता मृत्यूदंडाच्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.
रूग्णांना लावलं हवेचं इंजेक्शन
मिरर डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण जून २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यानच आहे. वकिलांनी न्यायाधिशांना सांगितलं की, डेविनने मुद्दामहून रूग्णांच्या नसांमध्ये हवेचं इंजेक्शन टोचलं. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जवळपास २ आठवड्यांपर्यंत सुनावणीनंतर कोर्टाने यूकेती हॉल्सिविलेच्या ३७ वर्षीय विलियम डेविसला चार लोकांच्या हत्ये प्रकरणी दोषी ठरवलं. डेविसने त्याच्यावरील आरोपी स्वीकारले नाहीत.
का केली हत्या?
वकिलांनी सांगितलं की, या हत्येंमागे डेविसचा एकच उद्देश होता. आणि तो हा होता की, त्याला लोकांना मारण्यात मजा येत होती. त्यामुळे त्याने चोर लोकांची मुद्दामहून हत्या केली.
लोकांना तडफडत बघता होता
रिपोर्टनुसार, वकिल गेटवुड म्हणाले की, 'विल डेविसचा उद्देश एक होता की, त्याला लोकांना मारण आवडत होतं. त्याने रूग्णांना इंजेक्शनमध्ये हवा भरून मारण्यात मजा येत होती'. त्यांनी हॉस्पिटलच्या रूममध्ये लागलेल्या व्हिडीओचा हवाला देत सांगितलं की, डेविस डेविस रूग्णांना रूममध्ये घेऊन जाऊन त्यांना हवा भरलेलं इंजेक्शन टोचत होता आणि नंतर रूमच्या एका कोपऱ्यात उभा राहून रूग्णांना तडफडत मरताना बघत होता. यात त्याला मजा येत होती.
तेच डेविसच्या वकिलांनी त्याचा बचाव करत सांगितलं की, त्याच्याकडे एक आनंदी परिवार आहे. त्याला एक पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्याच्याकडे असं करण्याचं काहीच कारण नाही.