ब्रिटनच्या एक हॉस्पिटलमध्ये काम करणारा ६७ वर्षी डेविड फुलरबाबत (David Fuller) असं सत्य समोर आलं आहे, ज्याबाबत वाचल्यावर लोक हैराण झाले आहेत. फुलरने शवागृहात कमीत कमी १०० मृतदेहांसोबत लैंगिक संबंध (Sex With Dead Body) ठेवले होते. ज्यात महिला आणि मुलांचा समावेश होता. पोलिसांनुसार, मर्डर केसमध्ये पकडला गेल्यानंतर फुलरने ही बाब मान्य केली.
पोलिसांनी फुलरला ३ डिसेंबर २०२० ला अटक केली होती. तेव्हा DNA मधून मिळालेल्या पुराव्याने त्याला १९८७ मध्ये दोन महिलांच्या मर्डर मिस्ट्रीसोबत जोडलं. २५ वर्षीय वेंडी नेल आणि २० वर्षीय कॅरोलिन पियर्सच्या तीन दशक जुन्या हत्या केसमध्ये फुलर पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या, त्या जाणून घेतल्यावर सगळेच हैराण झाले.
घरात सापडल्या विचित्र वस्तू
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, जेव्हा पोलीस फुलरच्या घराची झडती घेत होते, तेव्हा लैंगिक शोषणासंबंधी हजारो फोटो सापडले. हार्ड ड्राइव, फ्लॉपी डिस्क, डीव्हिडी आणि मेमरी कार्डमध्ये अश्लील कंटेंट मिळालं. सर्वात जास्त धक्का तर तेव्हा बसला जेव्हा पोलिसांना शवागृहात मृतदेहांसोबत ठेवतानाचे त्याचे फोटो सापडले. काही फोटो तर त्याने पीडितांच्या नावाने फोल्डर्समध्ये सेव्ह केले होते. एका व्हिडीओत तो तीन मुलांसह महिलेच्या शऱीराला छेडछाड करताना दिसत आहे.मृतदेहांसोबत ठेवले संबंध
पोलिसांनी सांगितलं की, फुलरने २००८ आणि नोव्हेंबर २०२० दरम्यान ९९ मृतदेहांसोबत छेडछाड केली होती. यादरम्यान फुलरने केंट, ससेक्स आणि ट्यूनब्रिज वेल्स हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. चौकशी अधिकारी ७८ मृतदेह केवळ ७८ मृतदेहांची ओळख पटवण्यात सक्षम होते. त्यांच्याकडे फुलरने हे कृत्य केलं होतं.
असं सांगितलं आहे की, फुलरने मृतदेहांसोबत संबंध ठेवल्यानंतर ही घटना लक्षात ठेवण्यासाठी डायरीत नोट करत होता. त्याच्या कृत्यांची एक विस्तृत डायरी बनवून ठेवली होती. चौकशी अधिकारी म्हणाले की, फुलर हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होता. दुसरे कर्मचारी गेल्यानंतर तो लपून शवागृहात जात होता.
रिपोर्टनुसार, फुलरला ५१ गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यत आलं आहे. ज्यात ४४ केसेस मृतदेहासोबत छेडछाड करणे या केसेस आहेत. त्याला दोन मुली नेल आणि पियर्सच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे.