यूनायटेड किंगडम (United Kingdom) च्या कार्लिस्लेहून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे तीन मुलांच्या आई एका १४ वर्षाचया अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण (Mother of Three Sexually Abused School Boy) केलं. हे कृत्य तिने एकदा केलं असं नाही तर अनेकदा केलं. प्रकरणाचा खुलासा झाल्यावर पोलिसांनी महिलेला अटक केली आणि आता कोर्टाने तिला शिक्षा सुनावली आहे.
किती वर्षांची झाली शिक्षा
मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, दोषी महिलेचं नाव सोफी आहे. तिचं वय २७ वर्षे आहे. कार्लिस्लो क्राउन कोर्टाने शनिवारी सोफीला दोषी ठरवत २ वर्षे ९ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात सुनावणी दरम्यान सांगण्यात आले की, महिलेने अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण करताना व्हिडीओ तयार केला आणि फोटोही काढले. (हे पण वाचा : महिलेनेच तरुणीच्या अब्रूची लख्तरं काढली; तरुणाशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले)
फिर्यादी ह्यूज मॅकीने कोर्टाला सांगितले की, पीडित मुलाची सोफीसोबतच भेट तिच्या घरीच झाली होती. त्यानंतर सोफीने साधारण १३ वेळा अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पीडित मुलाने याबाबत आपल्या वडिलांना सांगितले.
महिलेच्या मोबाइलमधील पुरावे
यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी सोफी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी अॅक्शन घेत सोफीचा मोबाइल जप्त केला. ज्या अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आले. सोफीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलाला अश्लील मेसेजही पाठवले होते.(हे पण वाचा : संतापजनक! ६ वर्षीय नातीचा आजोबांकडून बलात्कार; ३ वर्षीय नातवाला २० रूपये देऊन बसवलं गप्प)
या घटनेच्या खुलाशानंतर सोफीने आधी तर तिच्यावरील आरोप फेटाळून लावले. पण पोलिसांनी तिची कसून चौकशी केली त्यानंतर तिने तिचा गुन्हा कबूल केला. पीडित मुलाचे वडील म्हणाले की, त्यांनी जेव्हा याबाबत ऐकलं तर त्यांना धक्का बसला. मानसिक आणि शारीरिक रूपाने याचा मुलावर फार वाईट परिणाम झाला आहे. हे चुकीचं आहे. मला माझ्या मुलीची चिंता आहे.