उना – एकीककडे जग व्हॉट्सअपच्या माध्यमातून जवळ आलं आहे. तर दुसरीकडे याचा वापर करुन अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक होत असल्याचे प्रकारही घडत आहेत. अशा प्रकारामुळे सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उना जिल्ह्यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून मैत्री झाल्याने युवतीला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. जिच्यासाठी या युवतीने पोलीस ठाणे गाठले आहे.
युवतीने युवकाविरोधात उना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिमाचल प्रदेशातील उना येथे युवतीसोबत बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. २६ वर्षीय पीडित युवतीने सांगितले की, २०१७ मध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून चंबा जिल्ह्यातील युवकासोबत तिचं बोलणं झालं. हळूहळू आमची मैत्री वाढली, त्यानंतर युवक मला भेटण्यासाठी उना येथे आला होता, आम्ही दोघं एका हॉटेलला गेलो, तिथे युवकाने माझे अश्लिल फोटो काढले, माझ्या इच्छेविरोधात लैगिंक संबंध ठेवले असं ती म्हणाली.
त्यानंतर युवकाने माझे अश्लिल फोटो व्हायरल करु ही धमकी देत मला भेटण्यासाठी बोलवत असे. भीतीपोटी मी युवकाला भेटण्यासाठी धर्मशाला, चंडीगढ, अमृतसर याठिकाणी गेली. इतकचं नाही तर युवकाने माझ्या चारित्र्याबद्दल वाईट गोष्टी सांगून माझं लग्न मोडलं असं युवतीने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या फेसबुक आयडीवरुन सोशल मीडियात माझे अश्लिल फोटो व्हायरल करण्यात आले. ही गोष्टी माझ्या मैत्रिणीकडून मला समजली. हे फोटो त्या युवकानेच व्हायरल केल्याचा आरोप युवतीने लावला आहे. त्यानंतर पोलिसांनीही युवकाविरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती एएसपी विनोद कुमार धीमान यांनी दिली आहे.