बिहारच्या सिवान जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाची परतफेड न केल्यानं एका ४० वर्षीय व्यक्तीनं जिल्ह्यातील मैरवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका ११ वर्षीय तरुणीशी लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. महेंद्र पांडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. तो मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी आहे.
मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील छेनी छपर गावात या घटनेची चर्चा सुरू आहे. लक्ष्मीपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा ४० वर्षीय महेंद्र पांडे यानं मुलीच्या आईला २ लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं. महेंद्र हा मुलीच्या आईकडे पैसे परत मागत होता. मुलीचे आई-वडील गरीब असल्यानं त्यांना काही कारणास्तव कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे त्यानं त्यांच्या ११ वर्षीय मुलीशी लग्न केलं आणि तिला घेऊन आपल्या घरी गेला.
काय म्हटलं आईनं?मैरवा पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीपूर गावात नातेवाईक आहेत. तिथे त्यांची मुलगी नेहमी येत असे. त्याच गावातील महेंद्र पांडे यांनी मला सांगितलं की मी तुमच्या मुलीला माझ्या घरी ठेवून तिचं शिक्षण पूर्ण करवेन. यानंतर महेंद्रनं तिच्याशी लग्न करून तिला आपल्याकडे ठेवलं. माझी मुलगी माझ्याकडे परत यावी अशी माझी इच्छा आहे, असं मुलीच्या आईनं सांगितलं.
कोण आहे आरोपी?आरोपी महेंद्र पांडे याचं वय ४० वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानं पहिलं ११ वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. त्यानंतर तो आता निरनिराळ्या गोष्टी सांगत आहे. आपल्याकडून चूक झाली, जी शिक्षा मिळेल ती भोगू, तर कधी आपली मुलगी म्हणून तिला आणल्याचं तो सांगत आहे. तर दुसरीकडे त्यानं मुलीच्या आईला फोन करून याची वाच्यता केल्यास तुम्हाला अडकवू अशी धमकी दिल्याचंही म्हटलं जात आहे.
काय म्हणाली मुलगी?या प्रकरणी अल्पवयीनं मुलीनं तिच्या आईनं महेंद्र पांडेकडून कर्ज घेतल्याचं म्हटलं. परंतु ते किती होतं याची माहिती नाही. माझी आई मला इकडे घेऊन आली आणि सोडून गेली, असं ती मुलगी म्हणाली. तर तो आपल्या मुलीला शिकवण्यासाठी घेऊन गेला आणि लग्न केलं असं तिच्या आईनं म्हटलं.